अमरावती- नांदगाव पेठ उड्डाणपूलावरुन दुचाकी खाली कोसळून विदूत विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. प्रतिक सुरेश राजूरकर असे मृत्यू अभियंत्याचे नाव आहे.
नांदगाव पेठ उड्डाणपूलावरुन कोसळली दुचाकी... अभियंत्याचा मृत्यू
अमरावती जिल्ह्यातील माहुली जहागीर येथील रहिवासी असलेला प्रतिक राजूरकर हा तिवसा शहरातील विदूत विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होता.
नांदगाव पेठ उड्डानपुलावरुन कोसळली दुचाकी...
अमरावती जिल्ह्यातील माहुली जहागीर येथील रहिवासी असलेला प्रतिक राजूरकर हा तिवसा शहरातील विदूत विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास प्रतिक अमरावती वरुन माहुली जहागीरला जात होता. दरम्यान, दुचाकीवरी नियंत्रण सुटल्याने नांदगाव पेठच्या उड्डाणपूलावरुन तो दुचाकीसह खाली कोसळला. यात त्याचा मृत्यू झाला आहे.