अमरावती - शेतकऱ्यांच्या विश्वासाचे असलेलं महाबीज बियाणे यावर्षी बोगस निघाल्यामुळे महाबीज विरोधात ठिक-ठिकाणी आंदोलने करण्यात आली. या सर्वाच्या पार्श्वभूमीत महाबीज बियाण्यामध्ये अधिकाऱ्यांकडूनच मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा खळबळजनक आरोप माजी कृषीमंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांनी केला आहे.
महाबीजमध्ये अधिकाऱ्यांकडून आर्थिक घोटाळा; माजी कृषीमंत्र्यांचा खळबळजनक आरोप - inquiry of mahabeej
शेतकऱ्यांना बियाणे पुरवणाऱ्या महाबीजच्या अधिकाऱ्यांकडून बियाण्यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी देखील बोंडे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणं मिळाव म्हणून महाबीजची स्थापना झाली. शेतकऱ्यांच विश्वासाच बियाणं म्हणून महाबीजकडे पाहिले जाते. पंरतु या वर्षी ७०% टक्के शेतकऱ्यांचे महाबीजकडून घेतले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे ज्या महाबीजवर शेतकऱ्यांचा विश्वास आहे, त्याच महाबीजने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याची टीकाही बोंडे यांनी केली. तसेच महाबीज मध्ये ज्या-ज्या अधिकाऱ्यांनी गुणवत्तेची चाचणी केली. जे बियाणं महाबीज मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले, त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.