महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेळघाटात भोंदूबाबाने दिले तीन वर्षीय मुलाच्या पोटाला चटके; बालकाची प्रकृती चिंताजनक - अमरावती अंधश्रद्धेच्या बातम्या

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात एका तीन वर्षाच्या बालकाला ताप आला होता. त्यावेळी त्यांना धामणगाव गडी येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र येथेही त्याला बरे वाटत नसल्याने त्यांना रुग्णालयातून भोंदूबाबाकडे नेण्यात आले. या भोंदुबाबाने तीन वर्षांच्या बालकाच्या पोटावर विळ्याने गरम आगीचे चटके दिल्याची हृदयदायक घटना घडली आहे.

Bhondubaba burn three-year-old boy's stomach in Melghat
मेळघाटात भोंदूबाबाने दिले तीन वर्षीय मुलाच्या पोटाला चटके

By

Published : Jun 3, 2021, 2:01 PM IST

अमरावती - ज्यांनी आपल्या किर्तनातून अंधश्रद्धेवर प्रहार केला. त्या संत गाडगेबाबा यांच्या अमरावती जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा कायम आहे. जिल्ह्यातील मेळघाटात अंधश्रद्धेचे नाहक बळी जात आहेत. तीन वर्षाच्या बालकाच्या पोटावर विळ्याने गरम आगीचे 70 पेक्षा जास्त चटके देण्यात आले आहेत. हा संताप जनक प्रकार जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात उघडकीस आला आहे. यामुळे परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रिया - चिखलदरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाढवे

बालकाची मृत्युशी झुंज -

जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात एका तीन वर्षाच्या बालकाला ताप आला होता. त्यावेळी त्यांना धामणगाव गडी येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र येथेही त्याला बरे वाटत नसल्याने त्यांना रुग्णालयातून भोंदूबाबाकडे नेण्यात आले. या भोंदुबाबाने तीन वर्षांच्या बालकाच्या पोटावर विळ्याने गरम आगीचे चटके दिले. त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यात त्याची मृत्युशी झुंज सुरू आहे.

भोंदूबाबाने दिले तीन वर्षीय मुलाच्या पोटाला चटके

लवकरच संबंधितावर कारवाई -

आदिवासी बांधव डॉक्टरांकडे उपचार न करता भोंदू बाबांकडे आदिवासी बांधव उपचार घेतात. त्यामुळे या ठिकाणी आरोग्य यंत्रणा करते तरी काय हा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी अद्यापही पोलिसांत तक्रार ही देण्यात आली नाही. दरम्यान या प्रकरणाची माहिती घेऊन लवकरच संबंधितावर कारवाई केली जाईल असे चिखलदरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाढवे यांनी सांगितले.

हेही वाचा - आईवरून शिवीगाळ केल्याने भर रस्त्यात दगडाने ठेचून खून; घटना सीसीटिव्हीत कैद

ABOUT THE AUTHOR

...view details