अमरावती - जिल्ह्यातील कुऱ्हा गावात गावकरी आणि अमरावती येथील जल प्रतिष्ठान यांच्याकडून 'पाणी बचाव, नदी बचाव' जनजागृती मोहिम सुरू करण्यात आले आहे. या मोहिमे अंतर्गत आज संपूर्ण गावकरी भोगावती नदी स्वच्छ करणार आहेत. आज संपूर्ण गावातील नागरिक महाश्रमदान करणार आहेत.
भोगावती नदी स्वच्छतेसाठी कुऱ्हा गावातील नागरिकांचा पुढाकार; 'पाणी बचाव, नदी बचाव' जनजागृती मोहिम सुरू - पाणी प्रश्न
कुऱ्हा गावात गावकरी आणि अमरावती येथील जल प्रतिष्ठान यांच्याकडून 'पाणी बचाव, नदी बचाव' जनजागृती मोहिम सुरू करण्यात आले आहे. या मोहिमे अंतर्गत आज संपूर्ण गावकरी भोगावती नदी स्वच्छ करणार आहेत. आज संपूर्ण गावातील नागरिक महाश्रमदान करणार आहेत.

जल प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात आलेली जनजागृती रॅली...
जल प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात आलेली जनजागृती रॅली...
अमरावतीच्या तिवसा तालुक्यात असा उपक्रम राबवणारे हे एकमेव गाव असून येथे सद्य भीषण पाणी टंचाई सुरू आहे. त्यामुळे मागील एका महिन्यापासून जल प्रतिष्ठानने गावातील सर्व घरांना एक ड्रम पाणी मोफत वाटत करत आहे. महत्वाचे म्हणजे ही चळवळ 'नॉन पॉलिटिकल' असून कोणत्याही राजकीय नेत्यांचा यात सहभाग नाही आणि योगदानही नाही.
कुऱहा गावातील नागरिकांनी आपल्याला लागणाऱ्या पाण्यासाठी भोगावती नदी स्वच्छ करणार आहे. आज मोठ्या संख्येने नागरिक या श्रमदानात सहभागी होणार आहेत.