अमरावती - केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात आज भारत बंदची हाक दिल्लीतील शेतकऱ्यांनी दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातही सकाळी बंद उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील तिवसा शहरातदेखील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तिवसा शहर बंद केले असून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली. केंद्र सरकारने लागू केलेले कायदे रद्द करण्याची मागणी ही आंदोलकांनी केली.
भारत बंद : अमरावतीत उत्स्फूर्त प्रतिसाद; तिवसा शहरात कडकडीत बंद - farmers agitation latest news
तिवसा शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तिवसा शहर बंद केले असून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली. केंद्र सरकारने लागू केलेले कायदे रद्द करण्याची मागणी ही आंदोलकांनी केली.
amravati
चौदा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील अमरावतीसह चौदा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्याही व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रही बंद असून इतर बाजारपेठाही बंद आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन होणार आहे.
Last Updated : Dec 8, 2020, 4:06 PM IST