महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत कडक लॉकडाऊन सुरुवात; पोलीस आयुक्त उतरल्या रस्त्यावर - कडक लॉकडाऊन सुरुवात

अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या आज स्वतःहा रस्त्यावर उतरुन वाहनांची विचारपूस केली. जे नागरिक काम नसताना शहरात फिरत आहे, अशा नागरिकांवर आता शहर पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे. तसेच पेट्रोल पंपावर फक्त अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांना पेट्रोल दिले जाणार आहे.

अमरावती लॉकडाऊन
अमरावती लॉकडाऊन

By

Published : May 9, 2021, 3:49 PM IST

Updated : May 9, 2021, 4:02 PM IST

अमरावती -अमरावती जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून (रविवार) 15 मेपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दुकान बंद राहणार आहे. शहरातही कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली असून शहरात 20पेक्षा जास्त ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या आज स्वतः रस्त्यावर उतरुन वाहनांची विचारपूस केली. जे नागरिक काम नसताना शहरात फिरत आहे, अशा नागरिकांवर आता शहर पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे. तसेच पेट्रोल पंपावर फक्त अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांना पेट्रोल दिले जाणार आहे. पेट्रोल पंपावर एक पोलीस कर्मचारी देखील तैनात करण्यात आला आहे.

अमरावतीत कडक लॉकडाऊन सुरुवात
अमरावती जिल्ह्यात मागील सात दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दररोज एक हजाराहून जास्त वाढत असल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 15 मेपर्यत संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनमध्ये आता जीवनावश्यक वस्तूची सर्व दुकाने ज्यात किराणा, फळ विक्रेते, भाजीपाला, दूध डेअरी सह आदी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. हेही वाचा -अमरावतीत सलग दुसऱ्या दिवशीही बाजारपेठेत तुफान गर्दी
Last Updated : May 9, 2021, 4:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details