महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'काळजी घ्या , आपल्याला कोरोनाविरुद्धचा लढा जिंकायचा आहे' - अमरावती न्यूज

आज माझे कुटुंब कोरोनाच्या संकटात सापडले आहे. माझे आई- वडील यांच्यासह कुटुंबातील 7 जण कोरोनाबाधित झाले आहेत. या संकटात काळजीने आमची विचारपूस करणाऱ्यांची सख्या भरपूर असली तरी या काळात सगळ्यांनीच काळजी घ्यावी, कोरोनाशी लढा आपल्याला जिंकायचा असल्याचे आवाहन बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केले आहे.

Be careful to win the fight against Corona says mla Ravi Rana
बडनेराचे आमदार रवी राणा

By

Published : Aug 3, 2020, 4:41 PM IST

अमरावती -आज माझे कुटुंब कोरोनाच्या संकटात सापडले आहे. माझे आई- वडील यांच्यासह कुटुंबातील 7 जण कोरोनाबाधित झाले आहेत. या संकटात काळजीने आमची विचारपूस करणाऱ्यांची सख्या भरपूर असली तरी या काळात सगळ्यांनीच काळजी घ्यावी, कोरोनाशी लढा आपल्याला जिंकायचा असल्याचे आवाहन बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केले आहे.

आमदार रवी राणा यांच्या आई- वडीलांसह बहीण, जावई, पुतण्या, भाची आणि अंगरक्षकाला कोरोना झाला आहे. राणा कुटुंबातील कोरोनाग्रस्त सदस्यांना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. दरम्यान, आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्यासह घरातील इतर सदस्यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे. असे असताना आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी लोकांची गर्दी त्यांच्या शंकरनगर येथील घरी उसळत आहे. आमदार रवी राणा यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. कोणीही चिंता कारायची गरज नाही. संयमाने स्वतःची काळजी घेऊनच आपल्याला कोरोनावर मात करायची असल्याचे ते म्हणाले.

माझे आई- वडील आज 70-72 वर्षांचे आहे. वृद्ध मंडळींची अधिक काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. कोरोनाविरुद्धचा लढा आपण नक्कीच जिंकू असे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details