अमरावती - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. संसर्ग शहरांपेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. निसर्गाच्या अदभूत सानिध्यात वसलेल्या मेळघाटातील अनेक गावांना कोरोनाने आपल्या कवेत घेतले आहे. त्यामुळे आदिवासी लोकांमध्ये भीती पसरली आहे. मेळघाटातील ज्या गावात सर्वाधिक रुग्ण आहे त्या गावात प्रशासनाकडून गावबंदी करण्यात आली आहे. तर अमरावती जिल्ह्यातील जिल्ह्यातील एकूण 1561 गावांपैकी 1284 गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केलेला आहे. 277 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे.
मेळघाटातील अनेक गावांत गावबंदी; कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाची सतर्कता
मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या अठराशे लोकसंख्येच्या देवगाव या गावात काही दिवसांपूर्वी कोरोनाने कहर केला होता. या गावात 350 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी जवळपास 85 नागरिक हे कोरोना बाधित आढळले होते. तर 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने उपायोजना करण्यात आल्या आहे. हे गाव पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
महिला
मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या अठराशे लोकसंख्येच्या देवगाव या गावात काही दिवसांपूर्वी कोरोनाने कहर केला होता. या गावात 350 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी जवळपास 85 नागरिक हे कोरोना बाधित आढळले होते. तर 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने उपायोजना करण्यात आल्या आहे. हे गाव पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. आता या गावतील पंधरा कोरोना बधितांवर घरीच उपचार सुरू आहे.