यवतमाळ - पुणे येथे पुजा चव्हाण हिने आत्महत्या केली कि तिची हत्या झाली, याचा उलगडी अद्याप झालेला नाही. या घटनेल चार दिवस उलगडून गेले आहे. पुजाला न्याय न मिळाल्यास बंजारा समाज रस्त्यावर उतरेल आणि त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा घुमांतू भटक्या विमुक्त जाती प्रदेशाध्यक्ष माया शेरे यांनी दिला आहे.
आत्महत्या की हत्या शासनाने उलगडा करावा -
जिल्ह्यासह राज्यात महिला अत्याचार आणि हत्येच्या घटनेत वाढ होत आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे महिलांमध्ये दहशतीचे वातावारणात आहे. पुजाच्या मृत्यूमुळे बंजारा समाजात रोष व्यक्त होत आहे. पुजाने आत्महत्या केली की आत्महत्या करण्यास तिला कोणी प्रवृत्त केले. याचा उलगडा लवकरात लवकर करावा, अशी मागणी माया शेरे यांनी केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यातील व्यक्ती कोण, याचा शोध लागला पाहिजे. तसेच मृतक पुजा हिचा मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांनी जप्त करून त्या व्यक्तीचा शोध घ्यावा, अशी मागणीदे खील त्यांनी केली आहे.
हेही वाचा - छोट्याशा गावात जन्म, लंडनमध्ये स्थापन केली कंपनी, आता पद्मभूषण मानकरी