अमरावती -राज्य सरकार तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाकांशी असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग १ मेपासून सुरु करण्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.परंतु ती हवेतच विरत असल्याचे दिसते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा 'ब्रेक द चेन' यामुळे या समृद्धी महामार्गावर काम करणारे जवळपास ५० टक्के मजूर उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड अशा राज्यातली असल्याने मागील लॉकडाऊनमुळे झालेले हाल आता होऊ नये, म्हणून आधीच गावी परतले आहे. यामुळे या मार्गाच्या अनेक ठिकाणचे काम रखडले आहे आणि त्यामुळेच १ मेपासून नागपूर ते शिर्डी दरम्यान सुरू होणाऱ्या महामार्गाला ब्रेक लागल्याचे पहायला मिळत आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची गती मंदावली - अमरावती लेटेस्ट न्यूज
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा 'ब्रेक द चेन' यामुळे या समृद्धी महामार्गावर काम करणारे जवळपास ५० टक्के मजूर उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड अशा राज्यातली असल्याने मागील लॉकडाऊनमुळे झालेले हाल आता होऊ नये, म्हणून आधीच गावी परतले आहे.
बाळासाहेब ठाकरे महामार्ग