महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BAKARI EID - अमरावतीत बकऱ्यांची खरेदी विक्री व्यवहार ऑनलाईनच; जिल्हा प्रशासनाचे निर्देश

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अमरावती महापालिकेने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कोरोना परिस्थितीचा विचार करता बकरी ईदची नमाज मशिद, ईदगाह किंवा सार्वजनिक ठिकाणी न करता घरीच अदा करावी. जनावरांचा बाजार भरण्यास परवानगी नसल्याने जनावरांची खरेदी ऑनलाइन करावी किंव्हा दूरध्वनीवरून खरेदी करावी.

BAKARI EID
BAKARI EID

By

Published : Jul 21, 2021, 7:33 AM IST

अमरावती - कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात असताना बुधवारी मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणानिमित्त प्रतिकात्मक कुर्बानी देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. त्यामुळे बकऱ्यांच्या खरेदीसाठी गर्दी होऊ नये यासाठी खरेदी - विक्री व्यवहार ऑनलाइन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. धार्मिक विधी मशिदीत न करता घरीच करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

बकऱ्यांची खरेदी विक्री व्यवहार ऑनलाईनच

महापालिकेकडून मार्गदर्शक सूचना

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अमरावती महापालिकेने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कोरोना परिस्थितीचा विचार करता बकरी ईदची नमाज मशिद, ईदगाह किंवा सार्वजनिक ठिकाणी न करता घरीच अदा करावी. जनावरांचा बाजार भरण्यास परवानगी नसल्याने जनावरांची खरेदी ऑनलाइन करावी किंव्हा दूरध्वनीवरून खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतोवर प्रतिबंधात्मक कुर्बानी करावी. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घातलेले निर्बंध कायम असून बकरी ईद निमित्त नियमात कुठलीही शिथिलता देण्यात आली नाही.

कत्तलखान्यांवर बंदी
बकरी ईद निमित्त महापालिकेच्यावतीने दरवर्षी विविध भागात तात्पुरत्या स्वरूपाचे कत्तलखाने उभारले जात होते. कोरोनामुळे यंदा कत्तलखाने सुरू राहणार नसल्याचे महापालिका प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

कत्तलखान्यांवर बंदी
शहराच्या चारही भागात चौकीबकरी ईदनिमित्त मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक केली जाते. यावर्षी बकरी ईदसाठी जनावरांचा बाजार भरणार नसला तरी जनावरांची लपून वाहतूक करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी बडनेरा, वलगाव, नानंदगव पेठ आणि वडाळी या शहरातील चारही दिशेकडील भागात पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. महापालिकेचे पथक तसेच पशुसंवर्धन विभागाचे पशुशल्यचिकित्सक तैनात ठेवण्यात आले आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. मोहन गोहत्रे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. बकऱ्यांची कत्तल किती प्रमाणात करावी यासाठी कुठलेही नियम नाहीत. तरीही कोरोना काळात गर्दी न करता तसेच कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी मुस्लिम बांधवांनी घेण्याचे आवाहन देखील डॉ. मोहन गोहत्रे यांनी केले.जिल्हाप्रशासनाचे निर्देशकोरोना काळात बकरी ईदनिमित्त कुठेही गर्दी होणार नाही तसेच जनावरांचा बाजार भरणार नाही आणि जनावारांची अवैध वाहतूक होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पशुसंवर्धन विभाग, महापालिका, पोलीस आयुक्तालय तसेच ग्रामीण पोलिसांना निर्देश दिले आहेत.

हेही वाचा -काश्मीर : पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नीसह मुलीवर दहशतवाद्यांचा गोळीबार

ABOUT THE AUTHOR

...view details