अमरावती -आपली जनावरे बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याना बजरंग दलाच्या ५ ते ६ कार्यकर्त्यांनी अमानुष मारहाण केली. ही घटना अमरावतीच्या तिवसा शहरात रविवारी सकाळी चार वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्यांला अटक केली असून अन्य कार्यकर्ते फरार आहेत.
जनावरे विक्रीस घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून अमानुष मारहाण - Amravati bajrang dal news
तिवसा शहरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जनावरे विक्रीस घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण केली. गोहत्या बंदीच्या नावाखाली बजरंग दलाचे कार्यकर्ते शेतकऱ्याना टार्गेट करुन मारहाण केल्याने शेतकऱ्यानी राग व्यक्त केला आहे.
अमरावतीच्या तिवसा शहरातील काही शेतकरी रविवारी सकाळी चार वाजता दोन मॅजिक ऑटो मधून चांदुर बाजार येथली बाजार पेठेत जनावरे विकण्यासाठी घेऊन जात होते. या वेळी तिवसा शहरातच पाच ते सह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी येऊन आम्हाला अमानुष मारहाण केल्याचा आरोप शेतकऱ्यानी केला आहे. मारहाणीमुळे शेतकऱ्यांच्या पाठीवर मारहाणीचे मोठे व्रण व जखमा झाल्या आहेत. गोहत्या बंदीच्या नावाखाली शेतकऱ्यांनाच टार्गेट करून बजरंग दलाच्या कर्यकर्त्यांनी मारहाण केल्याने संपात व्यक्त केला जात आहे.