अमरावती -अनुसूचित जाती, जमातीच्या अडचणी, ओबीसींचे प्रश्न तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यास केंद्र आणि राज्य शासन अपयशी ठरल्याचा आरोप करीत बहुजन समाज पार्टीच्यावतीने धरणे दिले. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे धरणे दिले.
अशा आहेत मागण्या -
- अनुसूचित जाती जमतीच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाला कायम ठेवण्यात यावे.
- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे.
- ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे.
- शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा.
- पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात यावे.
- घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात यावे.
- कोरोनामुळे रोजगार नसणाऱ्या गरीब वस्तीतील नागरिकांचे वीज बिल माफ करण्यात यावे.
- कोरोनाने दगवलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत घ्यावी.
- अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्वरित मंजूर व्हावे.
- एमपीएससी, यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्वरित रुजू करण्यात यावे, अशा विविध मागण्या बहुजन समाज पार्टीच्यावतीने करण्यात आल्या आहे.