अमरावती-यास चक्रीवादळ अतिशय तीव्र झाले असून त्याचा वेग 120 ते 130 किलोमीटरपर्यंत वाढला आहे. सध्या ओडिशावर हे वादळ धडकले असून तटबंदीला त्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे. या वादळाच्या प्रभाव वाढत असून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल झालेली आहे. 1 जूनला मान्सून केरळ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून 28 आणि 29 तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील तीस तारखेपर्यंत काही प्रमाणात पाऊस सुरू राहील, असा अंदाज अमरावती हवामान विभागाचे प्रमुख अनिल बंड यांनी वर्तविला आहे.
यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विदर्भात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता - यास चक्रीवादळ
1 जूनला मान्सून केरळ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून 28 आणि 29 तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील तीस तारखेपर्यंत काही प्रमाणात पाऊस सुरू राहील, असा अंदाज अमरावती हवामान विभागाचे प्रमुख अनिल बंड यांनी वर्तविला आहे.

अमरावती हवामान