महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्जमाफीच्या मुद्यावरुन बच्चू कडूंचा बँकांवर गंभीर आरोप - बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन बँकांवर आरोप

अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन बँकांवर एक गंभीर आरोप केला आहे. कर्जमाफीसाठी बँकेद्वारे सुरू असलेल्या हिशोबामध्ये जाणून-बुजून बँका गडबडी करत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे केल्या आहेत.

Bachhu kadu  comment on bank for debt forgiveness
बच्चू कडू

By

Published : Feb 8, 2020, 10:02 PM IST

अमरावती - राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन बँकांवर एक गंभीर आरोप केला आहे. कर्जमाफीसाठी बँकेद्वारे सुरू असलेल्या हिशोबामध्ये जाणून-बुजून बँका गडबडी करत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे केल्या आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांनी याची दखल घेत राज्य सरकारकडे अहवाल सादर केला आहे.

हेही वाचा - 'तुम्ही मोदींना माराल दंडे... तर आम्ही तुम्हाला फेकून मारू अंडे'

हेही वाचा - मानसी नाईक यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक,चार दिवसांची पोलीस कोठडी

बच्चू कडू यांनी राज्य सरकारकडे सादर केलेल्या अहवालामध्ये स्पष्ट केले आहे की, सरकार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ करणार आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्या शेतकऱ्यांना अनेक बँकांनी दुप्पट-तिप्पट व्याज आकारणी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि काही राष्ट्रीयीकृत बँकेने तीन ते चार पट व्याज लावल्याचे बच्चू कडू यांच्या निदर्शनास आले आहे. यावेळी मुद्दल व व्याज असे मिळून बँकेत 30 सप्टेंबर 2019 पर्यंत हप्ते न भरणारे आणि दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्यांना कर्जमाफी मिळणार आहे. पण या हिशोबामध्ये मोठी गडबड झाली असल्याचा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details