महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीटभट्टी मजुरांची नोंदणी करण्यासाठी बच्चू कडू स्वतः पोहचले लॅपटॉप घेऊन - बच्चू कडू वीटभट्टी कामगार मदत

राज्यात अनेक वीटभट्ट्यांवर हजारो मजूर काम करतात. त्यांच्यासाठी असलेल्या अनेक योजनांची माहिती नसल्याने ते त्यांच्या लाभांपासून वंचित राहतात. अमरावतीमध्ये असे होऊ नये म्हणून बच्चू कडू यांनी स्वत: या कामगारांची नोंदणी करून घेतली.

Bachchu Kadu
बच्चू कडू

By

Published : Feb 7, 2021, 12:16 PM IST

अमरावती - वीटभट्टीवर काम करणारे हजारो गोरगरीब मजूर हे शासनाच्या कामगार नोंदणी अभियानापासून वंचित राहू नये. त्यांनाही कामगार कल्याण योजनेचा पुरेपूर लाभ मिळावा यासाठी कामगार राज्यमंत्री बच्चू कडू वीटभट्टीवर पोहचले. तिथेच त्यांनी स्वतः लॅपटॉप काढून कामगारांची शेकडो वीटभट्टी कामगारांची नोंदणीकरून त्यांना कामगार कार्ड दिले.

बच्चू कडू यांनी वीटभट्टी मजुरांची नोंदणी केली

अमरावती जिल्ह्यात शेकडो वीटभट्ट्या आहे. या वीटभट्ट्यांवर हजारो गोरगरीब मजूर हे बाहेर गावातून काम करण्यासाठी येतात. मात्र, त्यांना शासनाच्या योजनाचा लाभ मिळत नसल्याने या मजुरांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांसह वीटभट्टी गाठली व कामगारांची नोंदणी करून घेतली.

खऱ्या-खुऱ्या कामगारांचा फायदा होईल -

वीटभट्टीवर काम करणारे मजूर हे स्थलांतरित असतात. कामाच्या शोधात ते येत असल्याने त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. कामगार योजनांची खरी गरज या लोकांना आहे. परंतू हेच लोक वंचित राहतात. त्यामुळेच आम्ही जागेवर येऊन वीटभट्टी कामगारांची नोंदणी केल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या-खुऱ्या कामगारांना याचा फायदा होइल आणि बोगस कामगार बाहेर काढले जातील, असेही ते म्हणाले.

भव्य मेळाव्याचे करणार आयोजन -

लवकरच अमरावती जिल्ह्यातील हजारो वीटभट्टी कामगारांसाठी वीटभट्टी मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. त्यातून त्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे बच्चू कडू म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details