महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती: राज्यमंत्री बच्चू कडूंंनी केले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबाचे सांत्वन - amravati breaking news

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन कुटुंबातील लोकांचे सांत्वन केले. तसेच घटनेची माहिती घेतली.

राज्यमंत्री बच्चू कडू
राज्यमंत्री बच्चू कडू

By

Published : Dec 24, 2020, 6:03 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी तालुक्यातील धनेगाव येथील एका संत्रा उत्पादक शेतकऱ्याने फसवणूक झाल्याने आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याने न्यायासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहली होती. त्यानंतर शेतकऱ्याने विष प्राशन करून स्वताला संपविले. अशोक भुयार वय (55 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू

आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन-

या शेतकरी आत्महत्येने राज्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे आज राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन कुटुंबातील लोकांचे सांत्वन केले. तसेच घटनेची माहिती घेतली. शेतकरी आत्महत्येची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश देत आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.

काय होते प्रकरण-

अशोक भुयार या शेतकऱ्याने आपला संत्रा बगीचा व्यापाऱ्याला विकला होता. तर व्यापाऱ्याने शेतकऱ्याला पैसे न देता मारहाण केली. या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला पोलीस उपनिरीक्षकाने देखील मारहाण केली. त्यामुळे आपली फसवणूक झाली व आपल्याला न्याय मिळाला नाही. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहत आत्महत्या केली होती. यात पोलीस उपनिरीक्षकांसह दोन संत्रा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन करत यात दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.

हेही वाचा-सिडको आणि महापालिकेने समन्वयातून नवी मुंबईचे विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत - मुख्यमंत्री ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details