महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत दुसरीकडं जाण्याचा विचार नाही : बच्चू कडूंनी केलं स्पष्ट - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

Bacchu Kadu On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे आज अमरावती जिल्ह्यात जाणार आहेत. त्यांना अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी चहा पिण्यासाठी निमंत्रण दिलं आहे. मात्र यावरुन बच्चू कडू हे महाविकास आघाडीत जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Bacchu Kadu On Sharad Pawar
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 11:20 AM IST

Updated : Dec 28, 2023, 11:27 AM IST

आमदार बच्चू कडू

अमरावती Bacchu Kadu On Sharad Pawar : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. एकनाथ शिंदे जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत इतर कुठल्याही आघाडीसोबत जाण्याचा माझा अजिबात विचार नाही, असं अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे. आज शरद पवार बच्चू कडू यांच्या चांदूरबाजार तालुक्यातील कुरळ पूर्ण या गावातील घरी चहा पिण्यासाठी येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार यांनी चहा प्यायलाही येऊ नये का :"राजकारणात अनेक लोक जे नाही, ते सर्व काही करत आहेत. आता शरद पवार यांनी माझ्या घरी चहा प्यायला ही येऊ नये का हेच मला कळतच नाही. शरद पवार अमरावतीवरून वझरला जात आहेत. आमच्या गावातून आमच्या घरासमोरून शरद पवार जात असताना आम्ही त्यांना साधा चहा प्यायला बोलवू नये का. आज ते आमच्या घरासमोरून जात असताना त्यांनी केलेल्या मदतीच्या जाणिवेतून त्यांचा आदर सत्कार आम्ही करतो आहे" असं बच्चू कडू म्हणाले.

यात कुठलंही राजकारण नाही :"मला पुन्हा एकदा महायुतीत यायचं आहे, यासाठीच मी शरद पवार यांना चहा प्यायला बोलावलं, असं बोललं जात आहे. त्यात कुठलंच तथ्य नाही. शरद पवार माझ्या घरी चहा प्यायला येत आहेत, यात कुठलंही राजकारण नाही. प्रहारला अमरावती लोकसभेची जागा हवी, असं जे काही बोललं जात आहे, त्यात अर्थ नाही. आम्हाला केवळ एखादी जागा नको आहे, तर आम्ही दोन-तीन ठिकाणी निवडणूक लढण्याचा विचार करत आहोत. वर्धा जिल्ह्यात आम्ही आमच्या पक्षाचा उमेदवार देण्याचा विचार करत आहोत" असं देखील बच्चू कडू म्हणाले. "अचलपूरची बंद असणारी विनले मिल सुरू व्हावी, यासाठी मी जे काही प्रयत्न केले होते, त्या प्रयत्नांना शरद पवार यांनी साथ दिली होती" असं देखील बच्चू कडू म्हणाले.

यशोमती ठाकूर यांच्या भावनेचा आदर :"आमदार यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीत बच्चू कडू यांनी परत यावं, अशी भावना व्यक्त केली आहे. त्या भावनेचा मी आदर करतो, मात्र एकनाथ शिंदे जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री राहतील, तोपर्यंत त्यांना सोडून इतर कुठंही जाण्याचा आम्ही विचार करू शकत नाही" असं देखील बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा :

  1. Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या नावावर बच्चू कडूंनी लाटली लाखोंची रक्कम; भाजपाचा गंभीर आरोप
  2. शरद पवारांचा अमरावती दौरा; आमदार बच्चू कडू यांची घेणार भेट, राजकीय घडामोडींना वेग
  3. शरद पवारांनी स्वीकारलं बच्चू कडूंचं निमंत्रण, बच्चू कडू महाविकास आघाडीत?
Last Updated : Dec 28, 2023, 11:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details