महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूत करणाऱ्या महामूर्खाला शोधलं पाहिजे - राज्यमंत्री बच्चू कडू

कांदा जीवनावश्यक वस्तूंमधून काढणार, असे सरकारचे धोरण येणार असल्याचे समजलं. प्रथमच मी सरकारचे अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो, पण कांदा जीवनावश्यक वस्तूत टाकणारा महामुर्ख कोण आहे, त्याला शोधलं पाहिजे, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.

bacchu kadu on Central Government onion crop Policy
कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूत करणाऱ्या महामूर्खाला शोधलं पाहिजे - राज्यमंत्री बच्चू कडू

By

Published : May 16, 2020, 10:49 AM IST

अमरावती- कांदा जीवनावश्यक वस्तूंमधून काढणार, असे सरकारचे धोरण येणार असल्याचे समजलं. प्रथमच मी सरकारचे अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो, पण कांदा जीवनावश्यक वस्तूत टाकणारा महामुर्ख कोण आहे, त्याला शोधलं पाहिजे, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. केंद्र सरकारने कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.

बच्चू कडू म्हणाले, 'कांदा खाल्ल्या नाही तर लोक मरतात असा एखादा सुज्ञ मला दाखवा. बच्चू कडू त्याचा गुलाम राहील. ही हरामी खरं तर संपली पाहिजे. कांदा निर्यातीला सबसिडी दिली पाहिजे. त्यामुळे कांदा जीवनावश्यक वस्तूंतून काढून त्याला सबसिडी दिली पाहिजे.'

राज्यमंत्री बच्चू कडू बोलताना...

सरकारने कांदा जीवनावश्यक वस्तूंमधून काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चांगला आहे. याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. पण, कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूत टाकणारा महामुर्ख कोण आहे, त्याला शोधलं पाहिजे, असेही बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा -बाजार समित्या पूर्ववत होण्याच्या मार्गावर; संचारबंदीचे नियम पाळून व्यवहार सुरू

हेही वाचा -मातृभूमीची ओढ; घर गाठण्यासाठी तरुणाचा सातशे किलोमीटर सायकल प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details