महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्त्वाचा '; भारत बंद यशस्वी करण्याचं बच्चू कडू यांच आवाहन - शेतकऱ्यांकडून भारत बंद

सिंघू बॉर्डरवर गेल्या 11 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करावे, यासाठी शेतकऱ्यांनी उद्या मंगळवारी भारत बंद पुकारला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही भारत बंदला यशस्वी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

बच्चू कडू
बच्चू कडू

By

Published : Dec 7, 2020, 1:31 PM IST

अमरावती - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे दिल्लीत येणारे सर्व रस्ते हे पंजाब, हरयाणा तसेच उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी अडवून धरले आहेत. गेल्या आठवडाभरापासून हे शेतकरी थंडीचा सामना करत दिल्लीच्या रस्त्यावर आहेत. शेतकऱ्यांनी उद्या भारत बंद पुकारला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही भारत बंदला यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

भारत बंद यशस्वी करण्याचं बच्चू कडू यांच आवाहन

7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्त्वाचा आहे. तसेच जात-पात धर्म प्रांत हे न पाहता सर्वांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊन भारत बंदला यशस्वी करण्याचे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली असून त्यांचा मोटारसायकल मोर्चा आज मध्यप्रदेशच्या भोपाळवरून दिल्लीकडे रवाना होणार आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांचा आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे.

'या' पक्षांचा पाठिंबा -

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला आम आदमी पार्टी, तेलंगणा राष्ट्र समिती आणि महाविकास आघाडीनेही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दिल्ली, तेलंगणा आणि महाराष्ट्रात हा बंद मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्याची चिन्हे आहे. यासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआय, राष्ट्रीय लोकशाही पार्टी, डीएमके, आरजेडी, जेएमएम, आरएसपी या पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details