अमरावती - उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर विहिरींचे अधिग्रहण करण्यात येते. त्याचप्रमाणे आता खासगी रुग्णालयांचे अधिग्रहण करण्याची गरज असल्याचे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यातच अनेक ठिकाणी खासगी रुग्णालये बंद असल्याने इतर रुग्णांचा भार शासकीय रुग्णालयांवर येत आहे. अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक संख्येत व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत.
विहिरींप्रमाणे खासगी रुग्णालयेही अधिग्रहण करणार; राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या सरकारला सूचना - bacchu kadu speaks on corona
उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर विहिरींचे अधिग्रहण करण्यात येते. त्याचप्रमाणे आता खासगी रुग्णालयांचे अधिग्रहण करण्याची गरज असल्याचे मत, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.
खासगी रुग्णालयांचे अधिग्रहण करण्याची गरज असल्याचे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.
संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा शेतामाल विकण्यासाठी सरकारने लवकरात लवकर उपाययोजना करावी.तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सुरक्षा कवच देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याचसोबत बाहेर गावावरून येणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवून त्यांना घरपोच सामान देण्याची मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.