अमरावती- देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. अमरावतीमध्येही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ६५ वर पोहचली आहे. अशात पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
'घराबाहेर निघाल तर सामना कोरोनाशी, १० दिवस अत्यंत महत्त्वाचे' - lockdown in amravati
अमरावतीमध्येही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे, घरातच राहा, असे आवाहन बच्चू कडू यांनी नागरिकांना केले.

बच्चू कडू
राज्यमंत्री बच्चू कडू
ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे, घरातच राहा, घराबाहेर पडल्यास आपल्याला कोरोनाशी सामना करावा लागेल. त्यामुळे सर्वांनी काळजी घेऊन अदृश्य शत्रूसोबत लढा द्या, असे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागरिकांना केले आहे.
Last Updated : May 6, 2020, 12:57 PM IST