अमरावती- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर न पडता शासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. यासाठी किर्तनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य पवन दवंडे यांनी घरात राहूनच किर्तनातून जनजागृती केली असून त्यांचा हा किर्तन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कोरोनावर मात करू.. कोरोनावर मात; पवन दवंडेंची किर्तनातून जनजागृती - कोरोना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर न पडता शासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. यासाठी किर्तनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य पवन दवंडे यांनी घरात राहूनच किर्तनातून जनजागृती केली असून त्यांचा हा किर्तन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते आहे.
पवन दवंडे व अन्य
जगात सध्या कोरोनाने थैमान घातला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन केले आहे. पण, काही लोक विनाकारण घराबाहेर पडतात. यामुळे त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना त्याचबरोबर पोलीस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होऊ शकतो. म्हणुन त्यांनी किर्तनातून ही जनजागृती केली.
हेही वाचा -लॉकडाऊनमध्या साजरा केला वाढदिवस, परराज्यातील स्थलांतरितांसाठी आशादायी आठवण
Last Updated : Apr 12, 2020, 3:09 PM IST