महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Automated Weather Station Amravati : स्वयंचलित हवामान केंद्र शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी की विमा कंपनीच्या ?

शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज (Accurate Weather Forecast) मिळावा व वातावरणातील बदलामुळे होणारे शेतीचे संभाव्य नुकसान टाळता यावे, या उद्देशाने शासनाच्या वतीने स्वयंचलित हवामान केंद्र (Automated weather station Amravati) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने मोर्शी तालुक्यातील हिवरखेड महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आले आहे; परंतु हिवरखेड मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र मंडळाच्या मध्यभागी दापोरी येथे न बसविता मोर्शी तालुक्यातील अखेरच्या टोकाला बसविल्यामुळे हिवरखेड मंडळातील फळ पीक विमा काढलेल्या हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विमा मदतीपासून (Fruit Crop Insurance Help) वंचित राहण्याची वेळ येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी केला आहे. (Latest news from Amravati)

Automated Weather Station Amravati
स्वयंचलित हवामान केंद्र

By

Published : Jan 4, 2023, 7:42 PM IST

अमरावती: हिवरखेड महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२१-२२ चा संत्रा मृग बहार फळपीक विमा मोठ्या प्रमाणात काढलेला होता. (Accurate Weather Forecast) महसूल विभाग व कृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे हिवरखेड मंडळातील स्वयंचलीत हवामान केंद्र (Automated weather station Amravati) महसूल मंडळाच्या मध्यभागी दापोरी येथे न बसविता मोर्शी तालुक्याच्या सीमेवरील उमरखेड येथे बसविले. यामुळे हिवरखेड मंडळामध्ये ५ जून ते १५ जुलै २०२१ दरम्यान दापोरी येथे ८५.५ मिली मीटर पावसाची नोंद झाली असून उमरखेड येथील स्वयंचलित हवामान केंद्रावर १९५ मिली मीटर पावसाची नोंद झाल्यामुळे हिवरखेड महसूल मंडळामध्ये अत्यल्प पाऊस होऊनही मृग बहार फळ पीक विम्याच्या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ हिवरखेड मंडळातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आली होती. (Fruit Crop Insurance Help) त्यामुळे विमा कंपनीचा कोट्यावधी रुपयांचा फायदा झाला असून स्वयंचलित हवामान केंद्र विमा कंपनीच्या फायद्यासाठी आहे की शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हे कळायला मार्ग नाही. (Latest news from Amravati)

शेतकरी मदतीपासून वंचित :हिवरखेड मंडळातील सन २०२१-२२ चा मृग संत्रा बहार फळपीक विमा मोठ्या प्रमाणात काढलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विम्याच्या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व विमाधारक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ मदत जमा करून, हिवरखेड मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र दापोरी येथे बसवून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी शासनाकडे केली आहे.

स्वयंचलित हवामान केंद्र कुणाच्या फायद्यासाठी ?शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा आणि शेतीचे संभाव्य नुकसान टळावे, या उद्देशाने उभारलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थिती गंज चढल्यागत झाली आहे़ ग्रामीण भागातील मंडळ कार्यालयांतर्गत उभारलेल्या या हवामान केंद्रांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत़ हवामानाची नोंद घेणारे काही यंत्रे झुडपामध्ये झाकून गेली असून हवामान केंद्र मंडळाच्या शेवटच्या टोकाला बसविल्यामुळे हवामानाची अचूक नोंद होणार कशी? याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून या गंभीर प्रकारामुळे फळ पीक विमा धारक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असून विमा कंपनीचा कोट्यावधी रुपयांचा फायदा होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details