अमरावती : शहरातील यादवराव देशमुख महाविद्यालयात सुरु असलेल्या विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धेदरम्यान रविवारी रात्री तिवसा शहरातील अशोक नगर परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय युवकाच्या मानेवर ब्लेडने वार करत हल्ला ( Attacked on 24 year old youth in Amravati ) झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ ( Blade Attacked Tiwsa in Amravati ) उडाली आहे.
Amravati Crime : धक्कादायक ! तिवसा शहरात 24 वर्षीय युवकावर ब्लेडने हल्ला... - ब्लेड हल्ला प्रकरण
अमरावती शहरातील यादवराव देशमुख महाविद्यालयाच्या मैदानात विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान तिवसा शहरातील अशोक नगर परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय युवकाच्या मानेवर ब्लेडने वार ( Attacked on 24 year old youth ) करत हल्ला झाल्याची घटना घडली. यात दोन युवकांना तिवसा पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे.

मानेवर ब्लेडने हल्ला : नितीन सर्कल पवार असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे. येथील देशमुख महाविद्यालयाच्या मैदानात विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यानच नितीन हा कबड्डी स्पर्धा पाहत असताना तेथून काही अंतरावर तो जाताच मागून आलेल्या तीन ते चार युवकांने शिवीगाळ करत त्याच्यावर ब्लेड ने हल्ला चढवला. आणि ब्लेडने नितीनच्या मानेवर वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जुन्या वादातून हा हल्ला केल्याची चर्चा शहरात आहे.
दोघांना अटक : या घटनेमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यात दोन युवकांना तिवसा पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे