महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे पोलीस उपनिरीक्षकास मारहाण - अमरावतीमध्ये पोलीस निरक्षकास मारहाण

कोरोनाच्या प्रादुर्भावापासून नागरिकांना कुठलाही धोका निर्माण होऊ नये, यासाठी डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस सरंक्षण करणाऱ्या पोलिसांवर हल्ले होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याच्या एका उपनिरीक्षकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

अमरावती
अमरावती

By

Published : Jul 22, 2020, 8:08 AM IST

अमरावती - देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून नागरिकांना कुठलाही धोका निर्माण होऊ नये, यासाठी डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस सरंक्षण करणाऱ्या पोलिसांवर हल्ले होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याच्या एका उपनिरीक्षकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

अंजनगाव सुर्जी शहरात गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे व काही कर्मचारी आलम चौकातून जात असताना एका युवकाने मास्क लावला नसल्याचे त्यांना दिसले. तेव्हा उपनिरीक्षकाने संबंधित युवकास मास्क संबंधी विचारणा केली असता, युवकाने पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर पकडली व हातातील लाकडी काठी हिसकून उपनिरीक्षकास ढकलले.

उपनिरक्षकाच्या मदतीस आलेल्या राहुल नामक शिपायास शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्याच्यासोबतच्या असलेल्या एका युवकाने पोलिसांना धमकीही दिली. यासंबधित तक्रार पोलीस उपनिरीक्षक राजेश जावरे यांनी अंजनगाव पोलीस स्थानकात नोंदवली आहे. सदर पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून परवेज खान जावेद खान (वय 21), शहेजाद खान रसूल खान (वय 35) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details