महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती : कला शिक्षकाची बाळासाहेब ठाकरे यांना अनोखी श्रद्धांजली - चित्रकार अजय जिरापुरे

आकर्षक रांगोळी आणि पेनवर्क रेखाटनाच्या माध्यमातून कला शिक्षक चित्रकार अजय जिरापुरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र साकारले आहे. चार चौरस फुटांची ही रांगोळी काढायला अजय यांना सात तास वेळ लागला.

कला शिक्षक चित्रकार अजय जिरापुरे

By

Published : Nov 17, 2019, 12:31 PM IST

अमरावती -शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त धामणगाव रेल्वे शहरातील कला शिक्षक चित्रकार अजय जिरापुरे यांनी अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. आकर्षक रांगोळी आणि पेनवर्क रेखाटनाच्या माध्यमातून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र साकारले आहे.

हेही वाच -देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओद्वारे वाहिली बाळासाहेबांना आदरांजली

चार चौरस फुटांची ही रांगोळी काढायला अजय यांना सात तास वेळ लागला. या रांगोळीत त्यांनी पंधरा वेगवेगळ्या रंगांचा वापर केला आहे. त्यासोबतच पेनवर्क शैलीत बाळासाहेबांचे रेखाटन काढण्यासाठी त्यांना तीन तास वेळ लागला. चित्रकार अजय यांनी आतापर्यंत डॉ. सुभाषचंद्र बोस, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आदी थोर पुरुषांच्या रांगोळ्या व पेनवर्क रेखाटले आहे. अजय यांनी यापूर्वी काढलेली काही रेखाटने लंडनयेथील प्रदर्शनातसुद्धा लावण्यात आली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details