महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 2, 2021, 8:30 PM IST

ETV Bharat / state

भाजप नेते अनिल बोंडेना तात्काळ अटक करा; सामाजिक कार्यकर्त्यांची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना पारदर्शी कामाचे आदेश दिल्याने त्यांनी राजकारण्यांच्यावतीने गटविकास अधिकारी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केले आहे. तेव्हा भाजपच्या अनिल बोंडे यांनी तिवसा गटविकास अधिकाऱ्यांना जाहीरपणे भाषणातून मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे चिथावणीखोर वक्तव्य करून अशांतता पसरविणाऱ्या डॉ. अनिल बोंडे यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी तिवसा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते
सामाजिक कार्यकर्ते

अमरावती - तिवसा पंचायत समितील रोजगार हमी योजनेतील कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण मिळत आहे. अधिकारी मृत्यू प्रकरणात तिवस्याचे गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई केली नाही तर स्वतः गटविकास अधिकाऱ्यांना फटके मारू, अस वक्तव्य भाजप नेते डॉ अनिल बोंडे यांनी केले. त्यावर विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

डॉ. अनिल बोंडे यांच्या वक्तव्या विरोधात तिवसा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आहेत. त्यांनी डॉ. अनिल बोंडे यांचा निषेध केला आहे. तिवस्याचे गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांना कार्यालयात येऊन मारण्याची धमकी देणे ही बाब असंवैधानिक असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. डॉ. अनिल बोंडे यांना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच गटविकास अधिकारी जाधव संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी तिवसा तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा-माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगात, 6 नोव्हेंबरपर्यंत 'ईडी' कोठडी


अनिल बोंडे यांच्याकडून गटविकास अधिकाऱ्यांना धमकी
तिवसा तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी यांची भेट घेउन निवेदन दिले. निवेदनात म्हटले, की तिवसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव कर्तव्यदक्ष तथा स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे. काहीं कर्मचाऱ्यांनी कामात अनियमितता केल्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव उपजिल्हाधिकारी यांच्याकडे जाधव यांनी पाठवला होता. तेव्हा त्या द्वेषातून एका विशिष्ट लॉबीने राजकारण्यांना हाताशी धरून डॉ. चेतन जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यात तथ्य नाही, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

हेही वाचा-बॉम्ब फोडा पण धूर होऊ देऊ नका; मुख्यमंत्र्यांचा टोला

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा डाव-
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्यावतीने झालेल्या आंदोलनात माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी भाषणातून तिवसा गटविकास अधिकाऱ्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. त्यांना जाहीरपणे कार्यालयात येऊन मारण्याची धमकी दिली आहे. तिवसा तालुक्यात भाजप पक्षाशी जुळलेले काही ठेकेदार आहेत. त्यांच्या मर्जीतील कामे होत नसल्याने डॉ. अनिल बोंडे यांनी गटविकास अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एका स्वच्छ प्रतिमेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना टार्गेट करून बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी निवेदनातून सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.


हेही वाचा-देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी


आरोप करणारे सर्व राजकारणी एका विशिष्ट समूहातील आहेत. तिवसा येथील दीड वर्षाच्या कार्यकाळात गटविकास अधिकारी यांच्याबद्दल सामान्य जनतेची एकही तक्रार नाही. भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना पारदर्शी कामाचे आदेश दिल्याने त्यांनी राजकारण्यांच्यावतीने गटविकास अधिकारी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केले आहे. तेव्हा भाजपच्या अनिल बोंडे यांनी तिवसा गटविकास अधिकाऱ्यांना जाहीरपणे भाषणातून मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे चिथावणीखोर वक्तव्य करून अशांतता पसरविणाऱ्या डॉ. अनिल बोंडे यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी तिवसा येथील सामाजिक कार्यकर्ते सागर भवते, संदेश मेश्राम, विकास तुरकाने यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?
अमरावतीच्या वरुड तालुक्यातील प्रमोद भिमरावजी निंबुरकर हे पंचायत समिती तिवसा येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागात तांत्रिक अधिकारी म्हणुन कार्यरत होते. दरम्यानच्या काळात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डाॅ. चेतन जाधव यांनी प्रमोद निंबोरकर यांच्यावर कामात हयगय, अनियमितता आदी कारणांचा ठपका ठेवला. त्यानुसार प्रमोद निंबुरकर यांच्या कार्यमुक्तीचा प्रस्ताव रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना पाठविला होता. उपजिल्हाधिकारी राम लंके यांनीही कुठलीही शहानीशा न करता बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचा दावा निंबुरकर यांनी केला होता. वरुडच्या बेनोडा पोलीस स्टेशनअंतर्गत मोर्शि ते वरुड रोडवर प्रमोद निंबुरकर यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.


काय आहे गटविकास अधिकारी यांच्या पत्रात...?
अमरावतीच्या तिवसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांनी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्यावर कामात अनियमितात असल्याचा ठपका ठेवला होता. त्या संदर्भात त्यांनी रोहयोचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना पत्र लिहिले होते. यामध्ये प्रमोद अंबुलकर हे स्वतः ऑफिसला उपस्थित न राहता अगोदर स्वाक्षरी करून खोटा दौरा टाकून ऑफिसला गैरहजर राहत असल्याचे म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details