अमरावती -जिल्ह्यातील परतवाडा शहरातील कश्यप पेट्रोल पंप समोरील ऑईल मिल व्यापारी विवेक मुरलीधर अग्रवाल यांच्या घरी दरोडा पडला. सोमवारीच्या मध्यरात्री २ च्या सुमारास सहा अज्ञात दरोडेखोरांनी हा सशस्त्र दरोडा घातला.
अमरावतीत ऑईल मिल मालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; रोकड व दागिन्यांसह 20 लाखांचा ऐवज लंपास - family
अमरावतीत ऑईल मिल मालकाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकला आहे. यामध्ये २० लाखाचा ऐवज लंपास केला.
दरोडेखोरांनी घरात घुसून अग्रवाल कुटुंबातील ४ सदस्यांना जिवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम दागिन्यासह एकूण 20 लाखांचा ऐवज लंपास केल्याचा अंदाज वर्तविण्यात जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक पोलिसांच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी शॉन पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले आहे. पोलिसांनी रात्रीच ठीक ठिकाणी नाकाबंदी केली होती. पोलीस आरोपींच्या शोधात असून, अद्यापही काहीच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. मात्र या घटनेने जिल्हात खळबळ उडाली आहे आहे.