अमरावती -दर्यापूर तालुक्यातील ईटकी गावातील एका शेतकरी कुटुंबावर गावातीलच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीने सशस्त्र हल्ला केला. या घटनेत कुटुंबातील चारजण जखमी झाले आहेत, तर एकजण गंभीर जखमी आहे. नंदकिशोर शेजे, गजानन शेजे, मिरा शेजे अशी जखमींची नावे आहेत. पुरुषोत्तम बंड आणि त्याचा सहकारी शंकरप्रतापसिंह ठाकुर अशी हल्लेखोरांची नावे आहेत.
हेही वाचा... #CAA आंदोलनादरम्यान मुस्लिम व्यक्तीने वाचवले पोलिसाचे प्राण
गजानन शेजे आणि त्यांच्या पत्नी मिरा शेतातून घरी आल्यानंतर आरोपी पुरुषोत्तम याने ठाकुर यांच्या शेतीच्या वादातून शेजे पती-पत्नी सोबत भांडण केले. यात त्यांना लाथा बुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार शेजे यांचे चुलतभाऊ नंदकिशोर यांना दिसल्यावर ते भांडण सोडवण्यासाठी गेले असता, पुरुषोत्तम याने त्यांच्यावर चाकूने वार केले.