अमरावती - कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी संशयितांचे अहवाल तत्काळ मिळावे आणि उपचार, उपाययोजनांना गती मिळावी यासाठी अमरावतीत लवकरात लवकर प्रयोगशाळा सुरू करण्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोरोना चाचणी लॅब कार्यान्वित करण्यास मान्यता मिळाली असून, सोमवारपर्यंत ही लॅब कार्यान्वित होईल, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात होणार कोरोनाची चाचणी, प्रयोगशाळा सुरु करण्यास 'आयुर्विज्ञान'ची मान्यता
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोरोना चाचणी लॅब कार्यान्वित करण्यास मान्यता मिळाली असून, सोमवारपर्यंत ही लॅब कार्यान्वित होईल, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने पाठवलेले मान्यतेचे पत्र आजच विद्यापीठाला प्राप्त झाले. त्यानुसार सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून, केवळ लॉगईन आयडी मिळण्याची कार्यवाही बाकी आहे. विद्यापीठात 2 बॅचेस आहेत. एका बॅचमध्ये 24 स्वॅब काढता येतात. त्यानुसार सध्या 48 चाचण्या दोन बॅचेसमध्ये होतील. अजून दोन बॅचेसला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. ते प्रशिक्षण लवकरच पूर्ण होऊन एकूण 96 चाचण्या होऊ शकतील. या कार्यवाहीमुळे चाचणी अहवाल तत्काळ मिळण्यास मदत होणार आहे.