अमरावती AP HC On Margadarsi Accounts : आंध्र प्रदेश सरकारला मोठा झटका देत उच्च न्यायालयानं मार्गदर्शी चिट फंडची बँक खाती गोठवण्याच्या सर्व पोलीस नोटिसांना स्थगिती दिली आहे.
- काय आहे प्रकरण :काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांनी मार्गदर्शी शाखा व्यवस्थापकांना चिराला, विशाखा आणि सीथमपेट शाखांची बँक खाती गोठवण्यास सांगून नोटीस दिली होती. त्यानंतर त्याला आव्हान देत व्यवस्थापकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयानं त्यांच्या सर्व नोटिसांना स्थगिती दिल्या.त्यामुळं त्यांना तात्काळ दिलासा मिळालाय.
दुसऱ्या प्रकरणातही दिलासा : उच्च न्यायालयानं अजून एका प्रकरणात मार्गदर्शी चिट फंड प्रायव्हेट लिमिटेडला दिलासा दिला आहे. हैदराबाद इथं राहणाऱ्या जी युरी रेड्डी यांनी मार्गदर्शी चिट फंडवर आरोप केले होते. या आरोपात त्यांनी रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव आणि व्यवस्थापकीय संचालक शैलजा किरण यांच्यावर आरोप केले होते. रामोजी समूहानं बळजबरीनं आणि धमकावून शेअर हस्तांतरित केल्याचा आरोप करत आंध्रप्रदेश सीआयडीकडं तक्रार करण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरुन या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. यावरुन, तक्रारदार जी. युरी. रेड्डी यांनी आपले शेअर 2016 मध्ये हस्तांतरित केलेत. त्यांना जर आपल्या शेअरचं हस्तांतरण चुकीच्या पद्धतीनं झालं असं वाटत असेल, तर त्यांनी योग्य ठिकाणी तक्रार करायला हवी, असं रामोजी समूहाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयानं राज्य सीआयडीच्या अधिकारक्षेत्रावर तीव्र आक्षेप घेत सीआयडीनं नोंदवलेल्या गुन्ह्यातील पुढील सर्व कारवाई ८ आठवड्यांसाठी स्थगित करण्याचा अंतरिम आदेश बुधवारी दिला.