अकोला - अमरावती मधील हमजा प्लॉट येथून आज दुपारी आलेला चार लाखांचा गांजा दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे. यामध्ये इरफान खान, जमीर खान अटक करण्यात आली आहे. या कारवाई मुळे एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
दहशतवाद विरोधी पथकास माहिती मिळाली की, अमरावती येथून एका वाहनामध्ये पिकअप वैन क्र. एपी - 04 - जीए - 8509 यामध्ये मादक अमली पदार्थ गांजा लपवून तस्करी केली जात आहे. हे अमली पदार्थ अकोल्यात हमजा प्लॉटमध्ये विक्रीसाठी येत आहेत.या माहितीच्या आधारावर मानव शो रूमजवळ नाकाबंदी करून प्राप्त झालेले वाहन पथकाने पकडले. तर वाहानामध्ये इरफान खान जमीर खान याच्या जवळ, 44 किलो मादक अमली पदार्थ गांजाची चार पोते भरलेली, ४ लाख ४ हजार ४०० रूपयांचा माल आणि पिकअप वॅन कींमत सहा लाख रुपये, असा एकूण दहा लाख रूपयांचा ऐवज पथकाने जप्त केला आहे.