अमरावती - पकडलेले वाळूचे ट्रक सोडल्याच्या बदल्यात लाच मागणाऱ्या तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी)ने अटक केली आहे. हेमंत गांगुर्डे (तहसीलदार) आणि अरविंद पवार (मंडळ अधिकारी) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
वरुड तहसील कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या एका मंडळ अधिकाऱ्याने 18 सप्टेंबर 2019 ला क्षमतेपेक्षा अधिक वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले. त्यावेळी संबधित वाळू व्यावसायिकाने तहसीलदारासोबत फोनवर बोलणी केली. त्यानंतर पकडलेले ट्रक सोडण्यात आले.
हेही वाचा -'हाता'च्या प्रचारासाठी एकवटलं 'घड्याळ'
मंडळ अधिकारी आणि तहसीलदाराने वाळू व्यावसायिकाकडे एक लाख रुपयांची लाच मागितली. दरम्यान, व्यावसायिकाने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्याला व्यावसायिकाने आपली तक्रार केल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी पैसे घेतले नाही. लाच मागितल्या प्रकरणी एसीबीच्या पथकाने वरुडच्या तहसीलदारासह मंडळ अधिकाऱ्याला मोर्शीमधून अटक केली. निवडणुकीच्या काळात वरिष्ठ दर्जाचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.