Farmer Destroys Orange Orchard : पोटच्या लेकराप्रमाणे १४ वर्ष ६५० संत्र्याची झाडं जगवली, आता दुर्दैवाने तोडण्याची वेळ आली; अमरावतीत शेतकऱ्याला अश्रू अनावर
सातत्याने संत्र्याची होणारी गळती, ढासळलेले बाजारभाव, सरकारचे चुकीचे धोरण यापुढे हतबल झालेल्या मोर्शी तालुक्यातील (Morshi Tahsil) संत्रा उत्पादक शेतकरी (Orange Grower) राजेंद्र जगाते यांनी आपली संत्र्याची ६०० झाडांची हिरवीगार बाग तोडायला सुरवात केली (Farmer Destroys Orange Orchard) आहे. पोटच्या लेकराप्रमाणे जगवलेली झाडे तोडण्याची वेळ आल्याने राजेंद्र यांना अश्रू अनावर झाले.
अमरावती :एक दोन नव्हे तर तबल १४ वर्ष रात्रीचा दिवस करून पोटच्या लेकराप्रमाणे ६५० संत्राची झाड जगवली. लोकांकडून कर्ज घेतलं. रक्ताचं पाणी करून अफाट कस्ट व मेहनत घेत खडतर मार्गातून अप्पर वर्धा धरणातून (Upper Wardha Dam) संत्रा बागेसाठी पाणी आणलं. यंदा नाही तर पुढच्या वर्षी संत्रा पिकातून बरकत होत, घरात समृद्धी येईन ही आशा होती. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे त्या शेतकऱ्याचे कष्ट ही थांबले. सातत्याने संत्राची होणारी गळती, ढासळलेले बाजारभाव, सरकारचे चुकीचे धोरण यापुढे हतबल झालेल्या मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी राजेंद्र जगाते यांनी आपली संत्राची ६०० झाडांची हिरवीगार बाग तोडायला सुरवात केली. दोन वर्षापूर्वी २०० झाडे तोडल्यानंतर आता उर्वरित ४५० झाडांवर त्यांनी जेसीबी चालवायला सुरवात केली. पोटच्या लेकराप्रमाणे १४ जगवलेली बाग डोळ्यादेखत उध्वस्त होत असल्याने राजेन्द्र जगाते यांना अश्रू अनावर झाले आहेत.
विदर्भाचा कॅलोफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी (Morshi Tahsil In Amaravati) तालुक्याची ओळख आहे. नागपूरसोबतच अमरावतीमधील संत्र्याला (Amaravati Orange) संपूर्ण जगात मागणी असते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे येथील संत्रा उत्पादक डबघाईला आला असून, संत्र्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्र्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पर्यायाने संत्रा उत्पादनाला लागलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपला संत्रा रस्त्यावर फेकून देण्याची तसेच हिरवीगार संत्रा झाडे तोडण्याची वेळ संत्रा उत्पादकांवर आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील येरला या गावात राजेंद्र बाबाराव जगाते या युवा शेतकऱ्यांकडे ४ एकर शेतीमध्ये संत्रा पीक आहे. संत्राच्या गोड रसाप्रमाने या शेतकऱ्यांने संत्राच्या भरवशावर गोड स्वप्न पाहली होती. पण ती धुळीस मिळाली आहेत. ऐन सिझनात होणारी संत्रा गळती, संत्र्याच्या दरात होणारी घसरण, विजेचा अनियमितपणा व पाण्याची टंचाई यासारख्या अनेक कारणांमुळे या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतातील 14 वर्षांची असलेली हिरवीगार संत्रा झाडी तोडण्याास सुरुवात केली आहे.