अमरावती - गुरुकुंज मोझरी येथून गुरुवारी भाजपने महाजनादेश यात्रेला प्रारंभ केला. मोझरी येथून अमरावती-नागपूर हायवेवर तिवसा येथे महाजनादेश यात्रेचा रथ जात असतानाच काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कर्जमाफीची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. गुरुकुंज मोझरी बसस्थानकाजवळ घडलेल्या या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली होती.
मुख्यमंत्री साहेब कर्जमाफी करा, भाजपच्या महाजनादेश यात्रेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी - नागरिकांना अभिवादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे नेते रथात बसून तिवसाकडे मार्गस्थ होत होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस नागरिकांना अभिवादन करत होते.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारने पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखा जोखा मांडण्यासाठी भाजपने महाजनादेश यात्रा काढली आहे. दरम्यान, मोझरीतील सभा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे नेते रथात बसून तिवसाकडे मार्गस्थ होत होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस नागरिकांना अभिवादन करत होते. मात्र, यात्रेच्या सुरुवातीलाच काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून साहेब आधी कर्जमाफी करा, कर्ज माफी अशा घोषणा दिल्या.