अमरावती - शहरात ९ वे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन ९ आणि १० मार्चला मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. याबाबत संमेलनाचे संयोजक प्रा. प्रसेनजीत तेलंग यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
अमरावतीत ९ आणि १० मार्चला अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन - sahitya samelan
या साहित्य संमेलनानिमित्त ९ मार्चला सकाळी ९ वाजता संत गाडगे महाराज समाधी मंदिर ते विमलाबाई देशमुख सभागृहापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.
या साहित्य संमेलनानिमित्त ९ मार्चला सकाळी ९ वाजता संत गाडगे महाराज समाधी मंदिर ते विमलाबाई देशमुख सभागृहापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. ११ वाजता डॉ. यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात लोकशाहीर संभाजी भगत साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार आहे. डॉ. भालचंद्र कानगो , आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
विधान परिषदेचे माजी सदस्य प्रा. बी.टी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित द्वितीय सत्रात ' आंबेडकर आणि मार्क्स नवे आकलन नव्या दिशा ' या विषयावर उद्धव कांबळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता डॉ. मेहबूब सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली 'अण्णाभाऊंच्या साहित्यातील श्रमिकांचा संघर्ष' या विषयावर आयोजित परिसंवादात डॉ. अजय पळवेकर, प्रा. डॉ. राकेश वानखेडे, डॉ. समाधान इंगळे सहभागी होणार आहेत, तर ६ वाजता होणाऱ्या 'राष्ट्रवादाचे वर्तमान' या परिसंवादात चंद्रकांत वानखडे, भारत पाटणकर सहभागी होणार आहेत. रात्री ८ वाजता 'शाहिर जलसा' चे आयोजित करण्यात आले आहे. १० मार्चला सकाळी १० वाजता डॉ. सुखदेव ढाणके यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. प्रा.संजय घरडे कवी संमेलनाचे संचालन करणार असून सुनीत झाडे, विरा राठोड, सुदाम सोनूले, माया वासनिक गेडाम आदी सहभागी होणार आहेत. अमरावतीकरांनी 'नववे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात' मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रा.प्रसेनजीत तेलंग यांनी केले.