अमरावती -अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमात १ करोड रुपया जिंकलेल्या बबिताताई ताडे यांची आज अंजनगाव सुर्जीमध्ये विजय रॅली काढण्यात आली. यावेळी त्यांच्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून त्यांना मिळालेल्या प्रेमाने त्या भारावून गेल्या होत्या.
'कौन बनेगा करोडपती' जिंकलेल्या बबिताताईंची अंजनगाव सुर्जीत विजय रॅली - कौन बनेगा करोडपती विजेत्या बबिता ताडे
अंजनगाव सुर्जीमधील बबिता ताडे यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या बुधवार-गुरुवारी झालेल्या एपिसोडमध्ये १ करोड रुपये जिंकले. यामुळे त्यांचे स्वागत करण्यात आले.
हेही वाचा - 'केबीसी'मध्ये १ करोड रुपये जिंकणाऱ्या बबिता ताडेंचं स्वप्न काय?
बबिताताई पंचफुला हरणे विद्यालयात खिचडी शिजवतात. तसेच त्या वेळ काढून अभ्यास देखील करीत होत्या. त्यामुळे त्यांनी कौन बनेगा करोडपतीच्या बुधवारी-गुरुवारी झालेल्या एपिसोडमध्ये १ करोड रुपये जिंकले. त्यामुळे देशभर त्यांचे कौतुक केले जात आहे. गावातून त्यांची विजय मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी लेझीम, सामाजिक संदेश देणाऱ्या म्हणीचे फलक हातात घेऊन रॅलीमध्ये सहभागी झाले होते. झाशीच्या राणीच्या वेशात भगवे फेटे घालून आलेल्या विद्यार्थीनींनी खिचडी शिजवणाऱ्या बबीताताईची विजय रॅली दुमदुमून गेली होती. यावेळी अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.