अमरावती - अंजनगाव सुर्जी या शहरातील एका नामवंत बार रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत जवळपास ४५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १३ जुगारींना ताब्यात घेण्यात आले आहे. अंजनगाव सुर्जीतील दर्यापूर रस्त्यावर 'स्टेट्स इन' नावाचा रेस्टॉरंट-बार आहे.
अमरावतीत 'हाय प्रोफाइल' जुगार अड्ड्यावर छापा ; ४५ लाखांच्या मुद्देमालासह १३ जण ताब्यात - अमरावतीत जुगाराच्या अड्ड्यावर छापा
अंजनगाव सुर्जी या शहरातील एका नामवंत बार रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत जवळपास ४५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १३ जुगारींना ताब्यात घेण्यात आले आहे.
अंजनगाव सुर्जी या शहरातील एका नामवंत बार रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाइल जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नामवंत लोकांचा हायप्रोफाइल जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती अंजनगाव पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास छापा टाकला.
या कारवाईत १३ संशयित आरोपींसह ४५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या हायप्रोफाइल जुगारात नामांकित व्यक्तींचा सहभाग असल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.