अमरावती- चिखलदरा येथील देवी पॉईंट परिसरात श्री आंबादेवी देवस्थान येथे चैत्र नवरात्र उत्सवादरम्यान पशुपक्षींचा बळी देण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यासंदर्भातला आदेश जारी केला आहे.
चिखलदरा येथील देवी पॉईंट परिसरात पशुबळी देण्यास निर्बंध
मेळघाटात चिखलदरा येथील अंबादेवी देवस्थान येथे आदिवासी समुदाय नवस फेडण्यासाठी पशू-पक्षांचा बळी देतात. नवरात्र उत्सवादरम्यान पशू-पक्षांचे बळी देण्याचे प्रमाण प्रचंड वाढते.
मेळघाटात चिखलदरा येथील अंबादेवी देवस्थान येथे आदिवासी समुदाय नवस फेडण्यासाठी पशू-पक्षांचा बळी देतात. नवरात्र उत्सवादरम्यान पशू-पक्षांचे बळी देण्याचे प्रमाण प्रचंड वाढते. मागील काही वर्षांपासून लाठी येथील श्री दिलीपबाबा गौरक्षण जीवदया, व्यसनमुक्ती संस्थेच्यावतीने या प्रकाराला विरोध केला जात आहे. संस्थेच्यावतीने नवरात्री उत्सवादरम्यान अनेक शाकाहारी भाविक चिखलदरा येथे देवीच्या दर्शनाला येतात. नवरात्र उत्सवादरम्यान पशू-पक्षांचा बळी देण्याची प्रथा बंद व्हावी आणि सर्व भाविकांना पवित्र वातावरणात देवीचे दर्शन व्हावे यासाठी देवी पॉईंट परिसरात नवरात्र काळात पशू बळीची प्रथा बंद व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनालाही पत्र दिले होते.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या प्रकारची दखल घेत नवरात्र उत्सवादरम्यान पशू-पक्षी व प्राणी यांचे बळी देण्यावर निर्बंध घालण्यात येत असल्याचा आदेश जारी केला आहे.