अमरावती -संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आजपासून सुरू होणार होत्या. मात्र, विद्यापीठाने परीक्षा सुरू होण्याच्या काही तास आधीच पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
अमरावती: विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप - अंतिम वर्षाची परीक्षा
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आजपासून सुरू होणार होत्या. मात्र, विद्यापीठाने परीक्षा सुरू होण्याच्या काही तास आधीच पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय.
1ऑक्टोबरपासून अंतिम वर्षांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. परंतु विद्यापीठाच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 24 सप्टेंबरपासून संप पुकारला होता. संपामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या पुढे ढकललेल्या परीक्षा 12 ऑक्टोबरपासून घेण्यात येतील असे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते.
मात्र, आजपासून सुरू होणाऱ्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अमरावती विद्यापीठातून यंदा तब्बल 1 लाख 8 विद्यार्थी अंतीम वर्षाची परीक्षा देणार आहेत.