महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Former MP Anant Gudhe statement : 30 जानेवारीला गोडसेंच्या अनुयायांची हत्या करण्याचा दिवस - माजी खासदार अनंत गुढे

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धीरज लिंगाडे यांना 30 जानेवारीला प्रचंड मते देऊन आपल्याला विजयी करायचे आहे. आज आपल्या विरोधात असणाऱ्यांचा पूर्वज हा गोडसे होता. त्याने 30 जानेवारीला महात्मा गांधींची हत्या केली होती. आता या 30 जानेवारीला आपल्याला गोडसेंच्या अनुयायींची हत्या करून बदला घ्यायचा असल्याचे खळबळ जनक विधान अमरावतीचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते अनंत गुढे यांनी केले आहे.

MP Anant Gudhe statement
गोडसेंच्या अनुयायांची हत्या करण्याचा दिवस

By

Published : Jan 13, 2023, 12:53 PM IST

Updated : Jan 13, 2023, 1:44 PM IST

गोडसेंच्या अनुयायांची हत्या करण्याचा दिवस

अमरावती :अमरावतीत पंचवटी चौक स्थित वऱ्हाडे मंगल कार्यालयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली. पाचही जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करीत असताना खासदार अनंत गुढे यांनी वक्तव्य केले.


रणजीत पाटलांसाठी जीवाचे रान केले होते :अमरावती पदवीधर मतदार संघात दोन वेळा भारतीय जनता पार्टीचे पदवीधर मतदार संघाचे आमदार रणजीत पाटील यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जिवाचे रान केले. मात्र त्यांनी कुठलीही तमा न बाळगतात कार्यकर्त्याचे एकही काम केले नाही. भाजप शिवसेना युतीत असताना अनेक गुन्हे स्वतःवर दाखल झाले. मंत्री असताना सुद्धा रणजीत पाटील यांनी एकही गुन्हा रद्द करण्यासाठी प्रयत्न केला नाही. आम्ही अनेक शाळांमध्ये संगणक घेण्याची मागणी केली. मात्र एकाही शाळेत त्यांनी संगणक दिला नाही. लहान लहान गोष्टी सुद्धा ज्या व्यक्तीला जमत नाही त्या व्यक्तीला या पदावर राहण्याची योग्यता नाही असे देखील अनंत गुढे म्हणाले.



यांची होती उपस्थिती :यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधान परिषदेचे आमदार मिर्झा, आमदार अभिजीत वंजारी आमदार बळवंत वानखडे माझी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख अमरावतीचे माजी महापौर मिलिंद चिमटे, विलास इंगोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वराडे शिवसेनेचे नेते दिनेश बूब शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर सूर्यवंशी, शिवसेनेचे शहराध्यक्ष पराग गुडदे यांच्यासह अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मतदार संघनिहाय मतदारांची संख्या : नागपूर शिक्षक मतदार संघात 39 हजार 406 मतदारांनी नोंदणी केली आहे. २०१७ मध्ये ही संख्या 35 हजार 9 होती. यंदा नागपूर मतदारसंघात 43 हजार 97 मतदार वाढले आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदार संघात 61 हजार 529 मतदार झाले आहेत. 2017 मध्ये ही संख्या 58 हजार 410 होती. या मतदार संघात तीन हजार 119 मतदार वाढले आहेत. कोकण शिक्षक मतदार संघात 37 हजार 792 मतदार आहेत. 2017 मध्ये ही संख्या 37 हजार 604 होती. या मतदारसंघात केवळ 188 मतदार वाढले आहेत.

काय असते पदवीधर मतदारसंघ निवडणूक ? :महाराष्ट्राच्या विविध भागातील पदवीधर त्या त्या भागातून त्यांचा प्रतिनिधी आमदार निवडून देतात. पदवीधर मतदार संघ असतो ही गोष्ट खेडेगावातील मतदारांना जास्त प्रमाणात प्रचलित नाही, याचा प्रसार करणे ही एक महत्त्वाची व काळाची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्याला पदवीधर मतदारसंघ असतो. त्या मतदारसंघातून पदवीधारक निवडणुकीसाठी पात्र असतो.

Last Updated : Jan 13, 2023, 1:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details