अमरावती :अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत वरूड तालुक्यातील ( Accident in Warud taluka ) अमडापूर येथील रहिवासी असलेल्या तिघांचा दुर्दैवी मूत्यू ( 3 people died in a terrible accident on a two-wheeler ) झाला आहे. या अपघातात दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात हा भीषण अपघात झाला. शेंदूर्जनाघाट पोलिस स्टेशन हद्दीतील पांढूर्णा ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील पुसला नजिक पंढरी ते महेंद्रीच्या जंगला दरम्यान हा अपघात घडला आहे.
Accident : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक दिली; तिघांचा जागीच मृत्यू - terrible accident on two wheeler
ज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक ( 3 people died in a terrible accident on a two-wheeler ) दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अमरावतीमधील वरुड तालुक्यात ( Accident in Warud taluka ) झाली आहे.
तीन जणांचा मृत्यू - प्राप्त माहिती नुसार मनोहर रामलाल लांगापुरे (४०) , किसन शिवनाथ लांगापुरे (३२) , राजेश रामदास शिंदे (३५) हे तिघेही नाथजोगी समाजातील अमडापूर येथील रहिवासी असुन आज सकाळी १० वाजताच्या सुमारास पांढूर्णा येथे भिक्षा मागण्याकरीता आपल्या दुचाकी ने घरून निघाले होते. पांढूर्णा ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील पुसला नजीक असणा-या महेंद्री जंगला जवळ सकाळच्या दरम्यान त्यांचा दुचाकीला अज्ञात वाहनाने जब्बर धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
अमडापूर येथे शोककळा -या अपघातात या तिघांचा ही घटनास्थळीच दुर्दैवी मूत्यू झाल्याची माहीती समोर आली आहे. या तिंघावर काळाने घात घातला असल्याने अमडापूर येथे शोककळा पसरली आहे. शे.घाट पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असुन सदरील मूतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले आहे व अज्ञात वाहन चालका विरूद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार सतीश इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.