अमरावती - मेळघाटात आंधश्रद्धेचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. आजारी पडल्याने एका आठ महिन्याच्या चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके देण्यात आले आहेत. संबंधित प्रकार चिखलदरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम बोरदा गावात घडला आहे. या प्रकरणात मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चटके देण्यास प्रवृत्त करणाऱ्या महिलेला देखील ताब्यात घेतले आहे.
संतापजनक... मेळघाटात आठ महिन्यांच्या बाळाला गरम विळ्याचे चटके - churni hospital in amravati
मेळघाटात आंधश्रद्धेचा एक संतापजन प्रकार समोर आला आहे. आजारी पडल्याने एका आठ महिन्याच्या चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके देण्यात आले आहेत. संबंधित प्रकार चिखलदरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम बोरदा गावात घडला आहे.
मेळघाटातील चिखलदऱ्यात विसावलेल्या अतिदुर्गम अशा बोरधा गावात ही घटना घडली. शाम सज्जु तोटा या आठ महिन्यांचा मुलाला वडिलांनीच विळा गरम करून चटके दिले. या बालकाचे आठ दिवसांपासून पोट फुगत होते. तसेच त्याला खोकल्याचा त्रास होत होता. यामुळे त्याला दवाखान्यात न नेता 'भगत भुमका'कडे नेले. या व्यक्तीच्या सांगण्यावरून बालकाला गरम विळ्याचे चटके देण्यात आले. असा पोटफुगीला आदिवासी फोपसा म्हणतात. या बालकाला ताप होता. त्यामुळे हा गंभीर प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याचे उघडकीस आले आहे.
संबंधित बाळाला चुरनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. अशाच अंधश्रद्धेच्या प्रकारातून बोराळा येथेही गर्भवतीचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे.