अमरावती - राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेसह पोलीस यंत्रणेवर ताण वाढला आहे. संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये. गर्दी होऊन संसर्ग वाढू नये, यासाठी शहरातील रस्त्यांवर पोलीस अहोरात्र बंदोबस्तासाठी तैनात आहेत. त्यात अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याच समोर आले. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा ताण कमी व्हावा, यासाठी अमरावती येथील पोलिसांना मेडिटेशनचे धडे देण्यात येत आहेत.
राज्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. यामुळे चिंतेंचे वातावरण आहे. त्यात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. बंदोबस्ताचा वाढता ताण कमी व्हावा, यासाठी अमरावतीतील पोलिसांना मेडिटेशनचे धडे देण्यात येत आहेत. पोलिसांना 'मेडिटेशनचे धडे' हा उपक्रम अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला आहे.