अमरावती- गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती जिल्हा पाण्याचा प्रतीक्षेत असताना सालबर्डी आणि कारंजा घाडगे परिसरात पाऊस झाल्याने माडू नदीला पूर आला आहे. तसेच जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचा पाणीसाठा 3.78 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, या कालावधीपर्यंत ज्या प्रमाणात धरणाचा पाणीसाठा वाढणे अपेक्षित होते, त्याप्रमाणात पाणीसाठा वाढलेला नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
अमरावतीकरांची चिंता कायम; अप्पर वर्धा धरणाच्या पाणीसाठ्यात फक्त 3.78 टक्कांनी वाढ - storage
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाचा पाणीसाठा 14.26 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.
अप्पर वर्धा धरण
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. याच पावसामुळे अप्पर वर्धा धरणातील जलाशयात 3.78 टक्यांनी वाढ झाली आहे. परंतु अद्यापही चांगला पाऊस न झाल्याने वर्धा धरणाला चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत या धरणात केवळ 14.26 टक्केच जलसाठा शिल्लक आहे.
Last Updated : Jul 29, 2019, 10:09 AM IST