अमरावती -केंद्र शासनाने आणलेल्या नवीन कृषी कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा न करता तसेच कृषी तज्ज्ञांचे मत जाणून न घेता, हे कृषी कायदे आणले आहे. या नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथील शेतकरी आंदोलन करत आहे. आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांना दिल्ली येऊ न देणे, ही दडपशाही आहे, असा आरोप करत मंगळवारी पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद'मध्ये अमरावतीकरांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन किसान संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
अमरावतीकरांनी स्वयंस्फूर्तीने 'भारत बंद'मध्ये सहभागी व्हावे; किसान संघर्ष समितीचे आवाहन - amravati bharat band news
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात मंगळवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या भारत बंदमध्ये अमरावतीकरांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा, असे आवाहन किसान संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
अमरावतीकरांनी स्वयंस्फूर्तीने भारत बंदमध्ये सहभागी व्हावे; किसन संघर्ष समितीचे आवाहन
मंगळवारी अमरावती जिल्हा बंद राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व व्यापारी, ट्रान्सपोर्ट संघटना आंदोलनाला सहकार्य करणार असून सकळी 10 वाजता इर्विन चौक येथे राजकीय पक्ष आणि संघटना एकत्रित येणार आहे.
या राजकीय पक्षांचा सहभाग -
भारत बंदमध्ये काँग्रेस, आप, भाकप, माकप, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्ष आणि संघटनांचा सहभाग असणार आहे.