अमरावती - बिग बॉस मराठी 2 या रिअॅलिटी शोच्या ग्रँड फिनालेमध्ये अंतिम फेरीत विजयी झालेल्या अमरावती मधील शिव ठाकरे याच्या अमरावती मधील नंदनवन कॉलनीतील घरासमोरील शेजाऱ्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटून त्याच्या विजयाचा जल्लोश केला.
शिव ठाकरेच्या बिग बॉसमधील विजयानंतर अमरावतीत फटाके फोडून जल्लोश - bigg boss 2 grand finale
कलर्स मराठी वाहिनीवर गेल्या शंभर दिवसांपासून सुरू असलेल्या बिग बॉस सिजन टू चा निकाल रविवारी रात्री साडे अकरा वाजता लागला. 17 स्पर्धकांच्या या खेळात अमरावतीच्या शिव ठाकरेनी बाजी मारली.
![शिव ठाकरेच्या बिग बॉसमधील विजयानंतर अमरावतीत फटाके फोडून जल्लोश](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4312019-thumbnail-3x2-shiv.jpg)
शिव ठाकरे
कलर्स मराठी वाहिनीवर गेल्या शंभर दिवसांपासून सुरू असलेल्या बिग बॉस सिजन टू चा निकाल रविवारी रात्री साडे अकरा वाजता लागला. 17 स्पर्धकांच्या या खेळात अमरावतीच्या शिव ठाकरेनी बाजी मारली.
शिव ठाकरेच्या बिग बॉसमधील विजयानंतर अमरावतीत फटाके फोडून जल्लोश
या खेळाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असतानाच अमरावतीकरसुद्धा मोठ्या कुतूहलाने हा खेळ पाहत होते. दरम्यान साडे अकरा वाजता बिग बॉस महेश मांजरेकर यांनी शिव ठाकरेंच्या नावाची घोषणा करताच अमरावती परिसरातील लोकांनी जल्लोश साजरा केला.
Last Updated : Sep 2, 2019, 8:26 AM IST