महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती शहरातील उच्चशिक्षित तरुणीची सापांशी मैत्री

अमरावतीमध्ये कादंबरी चौधरी नावाची सर्पमित्र तरुणी राहते. साप हा आपला मित्र असून, सापाला मारू नका अशा प्रकारचे साप संवर्धन कार्यक्रम करुन ती लोकांमध्ये जागृती करत आहे.

kadambari-chaudhari
सर्पमित्र कादंबरी चौधरी

By

Published : Jan 21, 2020, 10:45 AM IST

Updated : Jan 22, 2020, 9:50 AM IST

अमरावती -साप हा शब्द जर कानावर पडला तर भिती वाटल्याशिवाय राहत नाही. जिथे साप पकडायला भलेभले घाबरतात तिथे मात्र एक तरुणी चक्क सहजपणे सापांना पकडून त्या सापांशी मैत्री करत आहे. आतापर्यंत फक्त पुरूष सर्पमित्र आपण ऐकिवात असू मात्र, इथे चक्क एक तरुणी नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस असे विषारी आणि बिनविषारी दोन्ही प्रकरचे साप पकडते व त्यांना जंगलात सोडते.

अमरावती शहरातील उच्चशिक्षित तरुणीची सापांशी मैत्री

हेही वाचा - वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाळू तस्करांनी घातला ट्रॅक्टर; पाच जणांना अटक

अमरावतीच्या कठोरा नाका परिसरामध्ये कादंबरी प्रदीप चौधरी ही सर्पमित्र तरुणी राहते. साप हा आपला मित्र आहे सापाला मारू नका त्याच्याशी मैत्री करा व पर्यावरण टिकवा असे ती सर्वांना सांगत आहे. कादंबरी ही उच्चशिक्षित असून, इंजिनिअरिंग क्षेत्रात तिने एमटेक केले आहे. सध्या ती एल. एल. बी. करित आहे. टीव्हीवर दिसणाऱ्या डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी आदी वाहिन्या पाहून, तिला हा लहानपणापासूनच छंद जडलेला आहे. पशुपक्षी संवर्धनासाठी ती 'सेव अँड सेफ अॅनिमल' नावाची संस्था चालवते. आतापर्यंत तिने 20 पेक्षा अधिक सापांना जीवदान दिले आहे.
कादंबरी फक्त सापांना जीवदान देत नाही तर ठिकठिकाणी जावून आपले प्रेजेंटशन सादर करुन 'साप संवर्धन जनजागृती' कार्यक्रम सादर करते.

हेही वाचा - अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळामध्ये भ्रष्टाचार झाला.. रोहित पवारांची चौकशीची मागणी

Last Updated : Jan 22, 2020, 9:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details