अमरावती : उत्तर पत्रिका तपासण्यास हयगय करणाऱ्या २०० विषय प्राध्यापकांना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाने नोटीसा पाठवल्या आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ( Sant Gadgebaba Amravati University Exam ) हिवाळी परीक्षा २०२२ नुकत्याच आटोपल्या आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा अकोला ,अमरावती ,वाशिम, बुलढाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यातील १७७ केंद्रावरून घेतल्या गेल्यात. साधारणत महिनाभर चाललेल्या या परीक्षा 16 जुलै रोजी संपल्यात. विद्यार्थ्यांचे निकाल त्वरित जाहीर करता यावे, याचे नियोजन केले. याकरिता विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळांनी उत्तर पत्रिका तपासणीस गती दिली जात असतांनाच उत्तर पत्रिका तपासण्यासाठी संबंधित विषयाच्या प्राध्यापकांना विद्यापीठाकडून मूल्यांकनासाठी पत्रही पाठवण्यात आले. परंतु बऱ्याचश्या प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या या नोटीसेकडे दुर्लक्ष करत विद्यापीठात मूल्यांकनास जाण्याचे टाळले . त्यामुळे विद्यापीठाचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.
Amravati University Issued Notice : मूल्यमापनाला गैरहजर राहणाऱ्या 200 प्राध्यापकांना अमरावती विद्यापीठाची नोटिस - Amravati University Exam 2022
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ( Sant Gadgebaba Amravati University ) 200 प्राध्यापकांना मूल्यांकनाला का अनूपस्थित राहिलात याचे उत्तर आता लेखी स्वरूपात पुढील सात दिवसात देण्याचे निर्देश, संत गाडगे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिले आहेत. प्राध्यापकांनी दिलेला लेखी खुलासा समाधानकारक नसल्यास विद्यापीठ कायद्यानुसार गैरहजर राहणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन कपात, सेवा पुस्तकात नोंद अशा प्रकारची कार्यवाही केल्या जाऊ शकते अशी माहिती आहे.
प्रत्येक सत्राच्या परीक्षा आटोपल्यावर संबंधित विशेष शिक्षकांना उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी विद्यापीठाकडून महाविद्यालयामार्फत पत्र पाठवून पाचारण करण्यात येते.
विद्यापीठाने विषय प्राध्यापकांना नोटीस पाठवून उत्तर पत्रिका तपासनीस गैरहजर राहण्याचा खुलासा सात दिवसांमध्ये मागितला आहे. प्राध्यापकांनी दिलेला लेखी खुलासा समाधानकारक नसल्यास विद्यापीठ कायद्यानुसार गैरहजर राहणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन कपात, सेवा पुस्तकात नोंद अशा प्रकारची कार्यवाही केल्या जाऊ शकते अशी माहिती आहे.